सहस्रावधी वर्षे परकीय समाज भारतात अव्याहतपणे येत आहे आणि इथेच स्थिर होऊन आपल्या समाजाचा अविभाज्य भाग म्हणून राहत आहे. मग ते आक्रमक म्हणून आलेले शक, कुशाण आणि हूण असतील किंवा शरणागत म्हणून आलेले यहूदी किंवा पारसी असतील. जे आक्रमक म्हणून आले, ते पराभूत झाल्यावर इथलेच होऊन राहिले, आणि जे शरणागत म्हणून आले, ते आमचा विश्वास न मोडता आमच्यातले होऊन गेले. अशी सहिष्णुतेची परंपरा असलेल्या देशाला गेली काही वर्षे प्रश्न विचारला जातो की “रोहिंग्या मुस्लिमांना तुम्ही आश्रय का देत नाही?”.
म्यानमारवरील इंग्रजीसत्तेच्या काळात तत्कालीन बंगाल मधून कामासाठी नेलेले हे रोहिंग्या तिथल्याच रखाईन प्रांतात राहायला लागले. पण तिथल्या संस्कृती आणि समाजाशी सुसंगत जीवन न जगता, आणि मर्यादित साधनांचा विचार न करता रोहिंग्यानी रखाईन प्रांतात लोकसंख्या विस्तार आणि भूमिसंपादन सुरु केले. अल्पसंख्य असलेल्या या समाजाने सुरु केलेल्या या आक्रमणाला तिथला बौद्ध समाज आधी सामंजस्याने सामोरे गेला. पण रोहिंग्यांनी सुरु केलेला हिंसाचार, लूटमार, शांत बौद्ध समाजावरील अत्याचार याची परिसीमा रखाईन प्रांतातील ११ भिक्कुंचा शिरच्छेदाने झाली. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ तेथील बौद्ध समाजाने या रोहिंग्यांचा चांगलाच प्रतिकार करून, त्यांना पळवून लावले. या म्यानमारमधील अंतर्गत कलहाचा फायदा करून भारतातील काही मुस्लिम संघटनांनी इथे आझाद मैदान सारखे दंगे घडवून आणले. मुस्लीम समाजाच्या असहिष्णुतेचं हे उत्तम उदाहरण आहे.
असा हा परास्त समाज गटा-गटाने बांगलादेशमार्गे भारतात येऊन पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये आज पसरला आहे. हे सगळे अवैधपणे भारतात राहून, भारतीय लोकांच्या साधनांवर आणि व्यवस्थेवर भार झाले आहेत. आणि इतकेच नाही तर इथल्या समाज व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आपला इस्लामी मूलतत्ववाद सर्वांवर थोपवत आहेत. अश्या या असहिष्णू समाजाला म्यानमारला परत पाठवण्याचा निर्णय हे भारताच्या दृष्टीने एक नैसर्गिक आणि रास्त पाऊल आहे.
पण हा निर्णय जाहीर होताच मोस्को, लंडन आणि अगदी वेटीकन सारख्या शहरात भारतातील रोहिंग्यांच्या बाजूने मोर्चे काढण्यात आले, आणि तिथे ही हे मोर्चे हिंसकच झाले. अनेक इस्लामी देशांनी भारतावर टीका करून रोहिंग्याना पाठिंबा दिला. पण ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान..’ या म्हणी प्रमाणे यातील एकाही “इस्लामी” देशाने स्वत: रोहिंग्यांना आश्रय देण्याची तयारी दाखवली नाही. आणि भारतातील तथाकथित पुरोगामी आणि सेक्युलर गटाने पुन्हा असहिष्णुतेचं तुणतुण वाजवायला सुरवात केलीच. आता रोहिंग्या मुस्लीम हे घुसखोर नसून आश्रित आहेत असा गवगवा सुरु करून, भारतीय जनतेची दिशाभूल करण्याचा नवीन डाव यांनी सुरु केला आहे.
भारतीय संस्कृतीच्या पूर्ण विपरीत घडण असलेल्या आणि इथल्या संस्कृतीत कधीही न मिसळता आपली वेगळी ओळख आणि परकीय निष्ठा सातत्याने जपणाऱ्या मुस्लीम समजाचा इतिहास हे रोहिंग्या मुस्लीम असाच पुढे चालवत राहणार हे नक्की. आता या असहिष्णू समजाला आणि त्यांना कोरडा पाठींबा देणाऱ्यांना असाच सहन करायचं का भारत सरकारच्या रोहिंग्यांना परत पातःव्ण्याच्या योग्य निर्णयाला पाठींबा द्यायचा हे ठरवणे सूज्ञ भारतीयांना अवघड जाणार नाही हे नक्की!
NOTE: This artcile was written in 2017, during the Rohingya Crisis in Myanmar & when the Social Media started discussing the issue of Illegal Rohingya Immigrants in Bharat, and whether we should provide them with official asylum.
Comentarios